नमस्कार मित्रांनो…
 
माझे नाव अनिरुद्ध… या ब्लॉगवरून मी तुम्हाला माझी प्रेम कहाणी सांगणार आहे… एक असफल तरी देखील खऱ्या प्रेमाची कहाणी… प्रेम कहाणीला सुरुवात करण्याआधी मी काही सांगू इच्छितो… अनिरुद्ध हे माझे खरे नाव नाही… अनघा हे माझ्या प्रेयसीचे खरे नाव नाही… नावे जरी खरी नसली तरी हि कहाणी मात्र १०० टक्के खरी आहे…यात मी नावांचे आणि जागांचे उल्लेख टाळणार आहे… कारण नावे किवा जागांचे उल्लेख वाचून न जाणो कुणाला भलतीच स्फूर्ती मिळाली तर… त्या मुळे कोणाला त्रास नको व्हायला… पण या कहाणी मधल्या सर्व घटना आणि पात्रे खरी आहेत… त्यातल्या भावना आणि कळकळ खरी आहे…
 
या निमित्ताने मी ते मंतरलेले क्षण पुन्हा जगण्याचा प्रयत्न करणार आहे… या कहाणीमुळे मला माझे मन मोकळे करण्याची संधी मिळते आहे हे मात्र खरे… कारण मी या सर्व गोष्टी आयुष्यभर कधीच कोणाला सांगू शकत नाही… या सर्व गोष्टी ब्लॉगवर लिहिण्यामागे कोणाची सहानुभूती किंवा प्रसिद्धी मिळवण्याचा अजिबात उद्देश नाही… वाचकांनी देखील काही तरी सनसनाटी किंवा नाट्यमय गोष्ठी वाचायला मिळतील अशी अपेक्षा करू नये… जरा स्पष्टच बोलतो, क्षमा असावी… पण निदान वाचकांचे तरी हि कथा वाचताना कोणतेही गैरसमज होऊ नयेत असे मला वाटते… 
 
प्रस्तावना जरा जास्तच लांबली पण त्याला इलाज नव्हता… सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे होते… आता मी जशी जमेल तशी हि कहाणी सांगायला पुढच्या पोस्ट पासून सुरुवात करणार आहे… पण कोणतेही पोस्ट वाचताना आपण एखादी कथा कादंबरी वाचत नसून एक खरी कथा वाचतोय हे वाचकांनी कृपया लक्षात घ्यावे… या पोस्टमधील काही विधानांमुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा असावी…  

4 Responses to

  1. हेमंत आठल्ये says:

    मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  2. Anirudhha… Katha kuthe ahe… Lavkarch post kar… Vaat pahat ahe tuzya kathechi

    • Anirudha says:

      तुम्ही दाखवलेल्या उत्सुकतेबद्दल धन्यवाद.. खरे तर गोष्टीची सुरुवात करायला खूप उशीर होतो आहे.. पण माझा इलाज नाही…सध्या ऑफिसमध्ये audit चे काम चालू असल्याने ब्लोग्कडे बघायला सुद्धा फुरसत नाही..पण लवकरच सुरुवात करेन.. माझी प्रेम कहाणी तुम्हाला नक्की वाचायला मिळेल.. कारण माझ्याकडे तोच एक मार्ग आहे मन हलके करण्याचा.. पुन्हा एकदा धन्यवाद..

  3. mala nahi mahit pan ase ka vatte ki aplya doghanchya ayushyat kahi samya ahe.. manunch etki utsukta yet ahe.. Apan lavkarch katha post kartal ashi asha ahe. vaat pahat ahe

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.