नमस्कार मित्रांनो…
माझे नाव अनिरुद्ध… या ब्लॉगवरून मी तुम्हाला माझी प्रेम कहाणी सांगणार आहे… एक असफल तरी देखील खऱ्या प्रेमाची कहाणी… प्रेम कहाणीला सुरुवात करण्याआधी मी काही सांगू इच्छितो… अनिरुद्ध हे माझे खरे नाव नाही… अनघा हे माझ्या प्रेयसीचे खरे नाव नाही… नावे जरी खरी नसली तरी हि कहाणी मात्र १०० टक्के खरी आहे…यात मी नावांचे आणि जागांचे उल्लेख टाळणार आहे… कारण नावे किवा जागांचे उल्लेख वाचून न जाणो कुणाला भलतीच स्फूर्ती मिळाली तर… त्या मुळे कोणाला त्रास नको व्हायला… पण या कहाणी मधल्या सर्व घटना आणि पात्रे खरी आहेत… त्यातल्या भावना आणि कळकळ खरी आहे…
या निमित्ताने मी ते मंतरलेले क्षण पुन्हा जगण्याचा प्रयत्न करणार आहे… या कहाणीमुळे मला माझे मन मोकळे करण्याची संधी मिळते आहे हे मात्र खरे… कारण मी या सर्व गोष्टी आयुष्यभर कधीच कोणाला सांगू शकत नाही… या सर्व गोष्टी ब्लॉगवर लिहिण्यामागे कोणाची सहानुभूती किंवा प्रसिद्धी मिळवण्याचा अजिबात उद्देश नाही… वाचकांनी देखील काही तरी सनसनाटी किंवा नाट्यमय गोष्ठी वाचायला मिळतील अशी अपेक्षा करू नये… जरा स्पष्टच बोलतो, क्षमा असावी… पण निदान वाचकांचे तरी हि कथा वाचताना कोणतेही गैरसमज होऊ नयेत असे मला वाटते…
प्रस्तावना जरा जास्तच लांबली पण त्याला इलाज नव्हता… सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे होते… आता मी जशी जमेल तशी हि कहाणी सांगायला पुढच्या पोस्ट पासून सुरुवात करणार आहे… पण कोणतेही पोस्ट वाचताना आपण एखादी कथा कादंबरी वाचत नसून एक खरी कथा वाचतोय हे वाचकांनी कृपया लक्षात घ्यावे… या पोस्टमधील काही विधानांमुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा असावी…
Anirudha यांनी पोस्ट केले